करमाळ्यात दारूच्या नशेत मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल

करमाळा(संदेश प्रतिनिधी) :करमाळा शहरातील घोलप चौक येथे वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसांनी दारूच्या नशेत मोटारसायकल चालवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.४७ वाजता करण्यात आली.

पोलिस कॉन्स्टेबल वैभव राऊत,श्री.हिंगमिरे आणि श्री.कदम हे तिघे मिळून वाहतूक नियमन करत असताना, एक मोटारसायकल चालक अडखळत वाहन चालवताना दिसला. तत्काळ त्याला मोटारसायकल रस्त्याच्याकडेला घेण्यास सांगितले.

सदर मोटारसायकल एम.एच.४५ आर १५७१ या क्रमांकाची असून चालकाने आपले नाव अमोल शिवाजी भोसले (वय ३१, रा. पोथरे, ता. करमाळा) असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याच्या तोंडातून दारूचा उग्र वास येत असल्याने ब्रेथ ॲनालायझर मशीनद्वारे त्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तो दारू पिलेल्याच्या स्थितीत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.



