दुष्काळ निधी तात्काळ वितरित करावी - कृषिमंत्री मुंडे यांच्याकडे चिवटे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे दिले निवेदन - Saptahik Sandesh

दुष्काळ निधी तात्काळ वितरित करावी – कृषिमंत्री मुंडे यांच्याकडे चिवटे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे दिले निवेदन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) –  करमाळा तालुक्यातील दुष्काळ निधीची १४१ कोटी रक्कम मंजूर झाली असून ती तात्काळ वितरित करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे काल(दि.१९) शेलगाव-वांगी येथील कार्यक्रमात केली

कृषिमंत्री मुंडे करमाळा दौऱ्यावर आले होते यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन दिले, यात

  • करमाळा तालुक्यातील 2933 शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन व इतर कृषी साहित्य खरेदीचे डीबीटी अंतर्गतचे 13 कोटी रुपये अनुदान थकीत असून ते तात्काळ देण्यात यावे
  • चालू वर्षीचा तुरीचा अग्रीम पिक विमा आठ कोटी रुपये व मका पिकाचा 26 लाख मंजूर झाला असून ही कोटी 26 लाखाची रक्कम विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना देण्याचे आदेश द्यावेत
  • शेलगाव वांगी येथे केळी संशोधन प्रकल्प मंजूर करावा
  • तालुका कृषी कार्यालयासाठी नवीन चार चाकी वाहन द्यावी.

या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की दुष्काळ निधीचे 141 कोटीची निधी मंजूर असून त्यासाठी तरतूद करून शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे

प्रमाणे डीबीटी अंतर्गत खरेदी केलेल्या शेती साहित्याचे 13 कोटी रुपये अनुदान व पिक विमा ची आठ कोटी 26 लाख रुपये तात्काळ द्यावीत दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत महत्त्वाची असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यात पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. यावेळी झालेल्या भाषणात कृषिमंत्री मुंडे यांनी सर्व मागण्यांना तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू अशी आश्वासन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!