दिशादर्शक कमानींमुळे कमला भवानी देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दुपटीने वाढेल - प्रवीण अवचर -

दिशादर्शक कमानींमुळे कमला भवानी देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दुपटीने वाढेल – प्रवीण अवचर

0

करमाळा (दि.२१ मे) –  पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर, अक्कलकोट, अहिल्यानगर, धाराशिव, गाणगापूर, राशीन आदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे गाठण्यासाठी चार प्रमुख जिल्ह्यांच्या सीमांवर वसलेल्या करमाळा शहरातुन भाविकांना जावे लागते.  असे असले तरी बाहेरच्या जिल्ह्यांतून आणि परराज्यांतून येणाऱ्या भाविकांना येथील ऐतिहासिक कमला भवानी देवी मंदिराचे स्थानिक महत्त्व माहित नसल्याने भाविकांची संख्या अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. भाविकांची संख्या वाढवण्यासाठी  करमाळा तालुक्याच्या प्रमुख मार्गांवर दिशादर्शक कमानी उभारण्यात यावी अशी मागणी मांगी (ता.करमाळा) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि गायक प्रवीण अवचर यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती श्री. अवचर म्हणाले की, करमाळा येथील कमला भवानी मातेचे भव्य मंदिर हे ऐतिहासिक व वास्तूशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण  आहे. या मंदिराची आणखीन प्रसिद्धी वाढून येथे मोठे तीर्थक्षेत्र नावारूपाला यावे यासाठी भाविकांची संख्या वाढली पाहिजे. करमाळ्याच्या मार्गावरून अनेक तीर्थक्षेत्र असल्याकारणाने दिशादर्शक कमानी उभारण्यात यावी अशी मागणी गेले अनेक वर्षांपासून मी केली आहे. सध्या करमाळा शहराच्या सौंदर्यीकरणासाठी चिवटे बंधूंचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्याकडे दिशादर्शक कमानी उभारण्याची विनंती केली असता, चिवटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निधी उपलब्ध करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.

या दिशादर्शक कमानी करमाळा शहराच्या चारही दिशांना उभारण्यात आल्यास मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढेल. वाढत्या भाविकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व सुख-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न समिती करेल.

अशोक घाटे, सदस्य – मंदिर समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!