अवकाळी पावसामुळे सरपडोह मधील शेतकऱ्यांच्या फळबागांचे प्रचंड नुकसान – भोसे मधील शेतकऱ्यांनाही फटका

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सरपडोह (ता.करमाळा) येथे आज (ता.२८) दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसामुळे सरपडोह गावातील शेतकरी बांधवांचे फळबागांचे प्रचंड नुकसान झालेले आहे, विशेषता गावातील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेली पीके या अवकाळी पावसामुळे जमिनीदोस्त झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे.
तरी शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्यासाठी शासनाकडून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईनिधी जाहीर करावी असे आवाहन उपसरपंच नाथराव रंदवे सरपडोह यांनी केले आहे.

भोसे (ता.करमाळा) येथे देखील दि.२८ एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास आलेल्या चक्रीवादळामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले. अनेकांच्या आंब्याच्या बागांचे नुकसान झाले.

माझी २ एकर केशर आंब्याची बाग आहे. काल आलेल्या चक्री वादळामुळे आमच्या बागेतील आंब्याच्या झाडांच्या फांद्या तुटल्या, अनेक कैऱ्या जमिनीवर कोसळल्या. यात आमचे प्रचंड नुकसान झाले आहे.
– श्री.बोलभट (मेजर), भिसे वस्ती, कोर्टी (ता.करमाळा)
