जेऊर मध्ये प्रथमच निघाली दुर्गामाता दौड

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – जेऊर मधील हनुमान चालीसा ग्रुप व बजरंग दल यांच्या वतीने मंगळवारी (दि.२४) दसऱ्या दिवशी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते.

शिवरायांचा जयजयकार व धार्मिक गीत गात बरोबर सकाळी 6.30 ला दौड सुरू होऊन जेऊर मधील मेन रोड , सराफ गल्ली , बाजारतळ, लव्हे रोड पउतका देवी , सुतार नेट जय भवानी मंडळ येथून जेऊर ग्रामदैवत श्री म्हाळसाकांत मंदिर मध्ये आरती करून दौड ची सांगता करण्यात आली

दौड साठी मंगळवार चालीसा ग्रुप व बजरंग दल जेऊर चे सदस्य श्री. दादासाहेब थोरात श्री. प्रदीप पवार सर , पवन कोठारी , दादासाहेब सूर्यवंशी, संजय नाना साळी , सचिन निमगिरे सुभाष शिरस्कर , प्रतिज्ञ दूनाखे , रवीकिरण माळवे , माधव सूर्यवंशी तसेच खास या दौड साठी करमाळा मधील संग्राम दयाळ , संकेत दयाळ , कृष्णा माने, Adv. प्रियाल अगरवाल तसेच शेटफळ मधील सतेश लबडे, गोपाळ पाटील, विठ्ठल रोंगे, गणेश पोळ हे शिवभक्त सामील झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!