महात्मा गांधी विद्यालयात ‘पणती महोत्सव’ साजरा – चिमुकल्यांनी बनवल्या इकोफ्रेंडली पणत्या…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयात पणती महोत्सव साजरा करण्यात आला. महात्मा गांधी विद्यालय संकुलात यावर्षी सुरु झालेल्या इंग्लीश मेडीयम स्कुल मध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नविन शैक्षणिक धोरण ( NEP ) नुसार व्यवसाय भिमूक व सर्जनशिलतेला वाव देणारे व कृतीयुक्त अध्ययनावर भर देणाऱ्या शैक्षणिक धोरणांचा अवलंब करत दिवाळी सण आठवडाभर जवळ आलेला असल्याने निसर्गपूरक कोणत्याही नैसर्गिक घटकास हानी न पोहचवता ‘ इको फ्रेंडली’ पणत्या बनवून त्या इतर विद्यार्थी व पालकांना विक्री करण्यात आल्या.

या उपक्रमामूळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कल्पकता , व्यवहारचातूर्य , खरेदी , विक्री , नफा – तोटा , मेहनतीचे महत्व , संवाद कौशल्य , मार्केटचा प्रत्यक्ष अनुभव इ कलागुण वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे . या पणती महोत्सवाचा एम .जी . इंग्लिश मेडियम च्या चिमूकल्या विद्यार्थ्यांसह महात्मा गांधी विद्यालय , तांत्रिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेज मधील विद्यार्थी – विद्यार्थीनिंनी तसेच शिक्षक शिक्षीका यांनी मोठ्या उत्साहाने पणत्या विकत घेतल्या . यावेळी मुख्याध्यापक अनिस बागवान , पर्यवेक्षक बाळकृष्ण पाटील , पर्यवेक्षिका सौ .नवले , विज्ञान शाखा विभाग प्रमुख विजय पवार , सर्व शिक्षक – शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!