आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल जाधव यांची निवड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा येथील अमोल जाधव यांची आम आदमी पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर निवड महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील व सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव म पाटील यांनी संघटनात्मक घोषणापत्र देऊन केली.
निवडीनंतर जाधव म्हणाले प्रत्येक तालुक्यातील, गावातील तसेच शहरातील नागरिकांना आम आदमी पार्टीचे लक्ष व धोरणे समजावून आम आदमी पार्टीचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम तन मन धनाने करेन.
निवडीनंतर आम आदमी पार्टीचे जिल्हा व राज्याचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या जाधव यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केले आहे.