जिल्हा नियोजन समितीवर ॲड.राहुल सावंत यांची निवड
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर पंचायत समितीचे माजी सदस्य व हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांची निवड झाली आहे. याबाबत निवड समितीने पत्र दिले आहे. जिल्ह्यातून पाच अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ॲड. राहुल सावंत यांचा समावेश आहे.
ॲड. सावंत यांच्या निवडीचे पत्र जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिले आहे. ॲड. सावंत हे हमाल पंचायतचे अध्यक्ष असून शेतकरी, शेतमजुर व कामगार यांच्या हिताचे काम करतात. पंचायत समितीचे सदस्य म्हणून त्यांची कारकिर्द गाजलेली आहे. वकिल म्हणूनही सर्वसामान्य नागरीकांना न्याय देण्याच्या दृष्टीने ते तत्पर असतात. कै. सुभाष आण्णा सावंत यांचा वारसा ते यथार्थपणे चालवत आहेत. विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या शिफारशीनुसार त्यांची निवड झाली आहे. चौकटीत…
सोलापूर जिल्हा नियोजन समिती मध्ये निवड झाल्याने करमाळा तालुक्यात विशेष काम करण्याची संधी मिळालेली आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून वेगवेगळी कामे सुचवून व ती मंजूर करून तालुक्यात वेगळे काम करण्याचे आपले धोरण आहे. करमाळा शहरातील नागरीकांचे व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळींचे पाठबळ असून या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण योग्य ते काम करू. …ॲड.राहुल सावंत