करमाळा,ता.25: सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी करमाळ्याच्या महिला नेत्या भावना भद्रेश गांधी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा किशोर शिवपुरे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र दिले आहे.
जेऊर येथे आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमांमध्ये हे पत्र त्यांना जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे व माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील ,आमदार रोहित पवार, सेवानिवृत्त न्यायाधीश बि. जे. कोळसे-पाटील, याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षा नलिनी जाधव, शहराध्यक्षा राजश्री कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजयमाला चवरे, ॲड. भद्रेश गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी भावना गांधी यांनी शिवसेनेच्या महिला आघाडी शहर प्रमुखपदापासून उप जिल्हाप्रमुख पर्यंत काम केलेले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा राज्य कार्यकारणी च्या सदस्य, दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीवरही काम केलेलं आहे. सध्या महिला दक्षता समितीवर त्या संस्थापक अध्यक्षा म्हणून काम करत आहेत. या सर्व कामाची नोंद घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे.