सेवानिवृत्त शिक्षकांच्या राज्य कार्यकारी मंडळात केमच्या हसिना मुलाणी यांची निवड
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – सेवानिवृत्त शिक्षकांच्या राज्य कार्यकारी मंडळात महिला प्रतिनिधी म्हणून केमच्या हसिना मुलाणी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची सहविचार सभा पुणे येथील शिक्षक भवनात पार पाडली. या सभेत ८ सेवानिवृत्त शिक्षकांचे राज्य कार्यकारी मंडळ निवडण्यात आली आहे. सर्वसाधारण सभा जेष्ट नेते किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिध्देश्वर पुस्तके सातारा विठ्ठल पवार हिगोली यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाले. सभेला २८ जिल्ह्यातील प्रतीनीधी उपस्थित होते.
अध्यक्ष म्हणून सोलापूरचे शिवानंद भरले सरचिटणीस म्हणून हिगोलीचे राजकुमार वर्हाडे कार्याध्यक्ष म्हणून पालघरचे गोपाल आघीवाले कोषाध्यक्ष म्हणून सातारचे तुकाराम कदम उपाध्यक्ष म्हणून सिधुदूर्गचे हरिभाऊ निसरड सल्लागार म्हणून नवी मुंबईचे प्रभाकर डहाके महीला प्रतीनीधी म्हणून केमच्या हसिना मुलाणी सोलापूरचे प्रिया सहस्त्रबुध्दे खाजगी शिक्षक प्रतीनीधी म्हणून मल्लीकार्जून पाटील आदींची एक मतानी अगामी पाच वर्षासाठी निवडण्यात आली आहे. राज्य स्तरावरून उर्वारीत जिल्ह्यातील सेवानिवृत्ताना प्रतीनीधी देण्याचे अधीकार कार्यकारी मंडळाला देण्यात आले.
केम येथील महिला प्रतिनिधी म्हणून हसिना मुलाणी यांची निवड झाल्याबद्दल केम केंद्राचे केंद्र प्रमुख महेश कांबळे, माजी सरपंच अजित तळेकर , प्रकाश कोरे संजय वाघमारे गुरूजी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जाधव एन डी सर, जनता बॅंकेचे अध्यक्ष दिलीप दादा तळेकर माजी शिक्षक देवकर गुरूजी, दादा नवले, पत्रकार संजय जाधव,महेश गुरव बिटरगावचे काका पाटील, कविटगावचे गणेश जाधव राजाराम भोंग, राजकुमार पाटील गटशिक्षणाधिकारी श्रीमती महाजन, केंद्र प्रमुख सुग्रीव नीळ, विस्तार अधिकारी नलवडे, नानासाहेब देवडकर रावगावचे शिक्षक वृंद, वडशिवणेचे शिवाजी पराडे, रत्नाकर कदम, शाम लोंढे, दत्तात्रय तळेकर सर्जेराव तळेकर, नवनाथ नागणे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.