करंजे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बागल गटाचे काकासाहेब सरडे यांची निवड..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करंजे (ता.करमाळा) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बागल गटाचे काकासाहेब रामानंद सरडे यांची निवड झाली आहे. पाच विरुद्ध चार अशा पध्दतीने निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांच्या हस्ते नूतन सरपंच काकासाहेब सरडे यांचा बागल संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.

सरपंचपदी काकासाहेब सरडे यांच्या निवडीबद्दल राज्य सहकारी साखर संघाच्या संचालिका आणि बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांनी मोबाईलवरून श्री सरडे यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच काकासाहेब सरडे यांच्यासह सौ सोनाली पप्पू सरडे, प्रतिभा सुभाष सरडे, अनुराधा राजेंद्र सरडे, सुनिता राजेंद्र जाधव हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी सुनील बापू सरडे, माजी सरपंच राहुल ठोसर ,बाबासाहेब पाटील, अण्णासाहेब गोडगे ,सचिन सरडे, बाळासाहेब वैद्य, विनोद सरडे, अरुण सरडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. करंजे गावाच्या विकासासाठी आपण सदैव स्वर्गीय मामांच्या विचारातून आपल्या पाठीशी खंबीरपणे राहू असे अभिवचन दिग्विजय बागल यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!