राजेरावरंभा गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी खंडू जगताप यांची निवड - Saptahik Sandesh

राजेरावरंभा गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी खंडू जगताप यांची निवड

खंडू जगताप


करमाळा (संदेश प्रतिनिधी) – गणेशोत्सव जवळ आला असून यावर्षी ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे नियोजन सुरू करण्यासाठी विविध गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुरू झालेल्या आहेत. करमाळा येथील मानाचा पहीला गणपती श्रीमंत राजेरावरंभा तरुण मंडळ गणेशोत्सव २०२४ च्या समितीच्या अध्यक्षपदी खंडू जगताप यांची निवड करण्यात आली आहे.

इतर निवडी पुढील प्रमाणे आहेत – उपाध्यक्षपदी दयानंद पवार,सचिवपदी रोहित चौधरी,खजिनदारपदी प्रतिक चव्हाण
मिरवणूक प्रमुखपदी रोहन पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व राजेरावरंभा तरुण मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *