अर्जुननगर-म्हसेवाडी ग्रुप ग्रामपंचायातीच्या सरपंचपदी श्रीमती चंद्रकला भोगे यांची निवड.. - Saptahik Sandesh

अर्जुननगर-म्हसेवाडी ग्रुप ग्रामपंचायातीच्या सरपंचपदी श्रीमती चंद्रकला भोगे यांची निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : अर्जुननगर-म्हसेवाडी ग्रुप ग्रामपंचायातीच्या ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडीमध्ये सरपंचपदी श्रीमती चंद्रकला धनाजी भोगे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच त्रिंबक ननवरे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी थोरात, मालन पवार, सोनाली ढवळे, अमोल पवार व अभिमन्यू धुमाळ इत्यादी ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने चंद्रकला भोगे यांची सरपंच म्हणून निवड केली आहे.

याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून श्री.काझि व श्री.ठोंबरे तसेच ग्रामसेवक म्हणून श्री.लटके यांनी काम पाहिले, या निवडीच्या प्रसंगी प्रकाश थोरात अनिल थोरात राजू थोरात दादा थोरात मुकेश पाटोळे फुलचंद भोगे नटराज भोगे सुरेश ढवळे बापू ढवळे गोरख भोगे प्रवीण भोगे नामदेव खताळ भाऊसाहेब अडसूळ बळी अवसरे माजी सरपंच ननवरे माजी सरपंच लोखंडे व सर्व अर्जुन नगर व म्हसेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!