केम तंटामुक्ती समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संपन्न
केम (संजय जाधव) – केम तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी अच्युतकाका पाटील यांची तर व उपाध्यक्षपदी सचिन तळेकर यांची बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
केम ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि. ४ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सारिका कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या वेळी उपसरपंच अनवर मुलाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी शिक्षक अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीनंतर बोलताना अच्युत काका पाटील म्हणाले की, आज केम ग्रामपंचायतीने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला मी तडा जावु देणार नाही. गावातील तंटे मी प्रमाणिकपणे मिटवून गावात शांतता ठेवण्यास प्रयत्न करणार आहे. यासाठी गावानेही साथ द्यावी. तसेच विविध प्रकरणात गरज लागेल तिथे पोलिसांना पण सहकार्य करणार. या निवडीनंतर नूतन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अच्युतकाका पाटील व उपाध्यक्ष सचिन तळेकर यांचे केम परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे