शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हा – माढा विभाग समन्वयकपदी स्नेहल कटारिया यांची निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हा माढा विभाग समन्वयकपदी व्यापारी स्नेहल दिपक कटारिया यांची निवड करण्यात आली.
सांगोला आमदार शहाजीबापू पाटील व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांचे हस्ते स्नेहल कटारिया यांना ७ मार्च रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे, नागेश काळे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे, ती मी पूर्ण अंतकरणाने पार पाडेल व जे गरजू आहेत, त्या सर्वांना वैद्यकीय मदत कक्षाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. तरी गरजवंतांनी वैद्यकीय मदत कक्षाकडून कधीही गरज पडल्यास माझ्याशी संपर्क साधावा, आपण सर्व गरजूंसाठी 24 तास सेवेसाठी तत्पर असुन वैद्यकीय मदत कक्षाच्या मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. – स्नेहल कटारिया मो.9422710001/ 9422710002