जय महाराष्ट्र मित्र मंडळ गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनिल जाधव यांची निवड

करमाळा (दि.१२) – येत्या सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी सुरू झालेल्या आहेत. करमाळा येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाची बैठक नुकतीच जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली.
चालू वर्षीच्या गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री सुनील जाधव यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर कार्याध्यक्षपदी संतोष उर्फ पिंटू शेठ गुगळे,उपाध्यक्षपदी सुदेश भंडारे, तुळशीराम दुधाट, खजिनदार पदी राजकुमार घाडगे, मिरवणूक प्रमुख पदी नितीन घोलप व आरास प्रमुखपदी इसाक दारूवाले यांच्या निवडी करण्यात आल्या.
जय महाराष्ट्र मित्र मंडळाची स्थापना 1988 रोजी झाली सध्याचे मंडळाचे 37 वे वर्ष आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे सर्वानुमते ठरले प्रतिष्ठापना मिरवणूक त्याचबरोबर श्रींच्या समोर भव्य दिव्य देखाव्याचे आयोजन व विसर्जन मिरवणुकीसाठी झांज पथक बेंजो ग्रुप लेझीम पथक आदी वाद्यवृंद सहित भव्य प्रमाणात आयोजन करण्याचे ठरविण्यात आले नूतन पदाधिकाऱ्यांचे फेटा शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले अशी माहिती जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे संस्थापक प्रवीण कटारिया यांनी दिली.

याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे सहसचिव विक्रम सिंह सूर्यवंशी, एडवोकेट कमलाकर वीर प्रमोद भाऊ चांदगुडे जय महाराष्ट्र पतसंस्थेचे चेअरमन अल्ताफ तांबोळी विक्रम सिंह सूर्यवंशी सर आदिनाथ चे माजी चेअरमन संतोष पाटील मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर रणजीत ढाणे जय महाराष्ट्र पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब इंदुरे मनोज पवार सतीश थोरबोले अनिल पाटील अतुल बनसुडे सुखदेव लष्कर पांडुरंग जाधव तरुण पटेल शिरीष थोरबोले अशोक चव्हाण राहुल परदेशी चंद्रकांत पाटील सर अविनाश जोशी मोहम्मद हाफिज कुरेशी सुनील बनसोडे दादा मिर्झा शिवशंकर वांगडे राजू चिवटे गजानन ननवरे बाळासाहेब कटारिया निलेश बोरा सुनील शेठ कटारिया संतोष कटारिया संजू शेठ कटारिया खतवाले सतीश शहापुरे गुरुजी गजेंद्र गुरव गुरुजी इनुस मनेरी जाफर घोडके दीपक खडके श्रावण इंगोले विशाल चुंबळकर, सुदाम लेंडवे, यशराज दोशी सचिन कटारिया नैनेश कटारिया राजेश कटारिया संकेत कटारिया अजिंक्य गुगळे मेघनील देवी डॉक्टर सुविध मेहता हेमंत देवी राहुल वनारसे राजूशेठ चिवटे मिठाईवाले वैभव वीर अकिब सय्यद कल्पेश राक्षे अल्तमश सय्यद प्रशांत अडसूळ राहुल किरवे राजू दिक्षित शफी मनेरी सौरभ आवटे आदीजण उपस्थित होते


