मोलमजूरी करुन आईने बनवले मुलाला आधिकारी – पुनवर येथील राहुल धनवडे याची कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पुनवर (ता.करमाळा) येथील श्रीमती रुक्मिणी गजानन धनवडे या आईने मोलमजूरी करुन आपला मुलगा राहुल गजानन धनवडे याला अधिकारी बनवले आहे, नगरपरिषद संवर्ग राज्यसेवा अंतर्गत टी .सी.एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात 39 व्या क्रमांकाने कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली.
राहुलचा हा प्रवास अतिशय खडतर असा आहे. राहुल ७ महिन्याचा असतानाच त्याचे पिताछत्र हरपले. राहुलला एक भाऊ व दोन बहिणी या सर्वांची संभाळण्याची जबाबदारी आईवर पडली.आईने अशा अवस्थेत न डगमगता येणाऱ्या संकटाला सामोरे जात मोल-मजूरी करुन आपल्या मुलांचे संगोपन करून त्यांना शिक्षण दिले. शिक्षण घेताना त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. एम.पी.एस.सी. परिक्षेसाठी आईने मोलमजूरी व भावाने ड्रायव्हर काम करून, वाटेल ते कष्ट करून खर्च पुरवला. राहुलने सात वर्षे एम .पी.एस.सी.चा अभ्यास करत, तरीही वेगवेगळ्या परीक्षेचे निकाल एक-दोन मार्कावरून जात असे, तरी आपले मन खचून न जाता आई आणि भावाच्या प्रेरणेमुळे अभ्यासाची चिकाटी न सोडता शेवटी नगरपरिषद संवर्ग राज्यसेवा अंतर्गत टी .सी.एस मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात 39 व्या क्रमांकाने कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली
राहुलच्या या कष्टातून मिळवलेल्या यशामुळे पुनवर ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक लक्ष्मण राख,प्रा.कुदळे, राहुलचे बंधू दादा धनवडे, सोमनाथ धनवडे, चुलते आजिनाथ धनवडे, सरपंच आनंद भांडवलकर, ग्रामपंचायत सदस्य बापू नरसाळे, माजी मार्केट कमिटी संचालक अरुण धुमाळ, शालेय समितीचे अध्यक्ष सोमनाथ थोरवे,सरपंच केशव शेळके,उपसरपंच सुनील जाधव, माजी उपसरपंच अतुल थोरवे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ नरसाळे,बाळू नरसाळे, डॉ.येताळ, सुप्रसिद्ध युवा उद्योजक युवराज साबळे, भारत नरसाळे, बापूराव नरसाळे, मा .सरपंच रामभाऊ नरसाळे,मा.उपसरपंच अशोक नरसाळे, भारत ननवरे, दादा येताळ, दादा धनवडे, नितिन येताळ,लक्ष्मण निंबाळकर,पोपट जाधव,रवींद्र जाधव,गणेश जाधव,अविनाश शेलार तसेच गावातील लहान थोर मंडळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.लक्ष्मण राख,अविनाश शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोमनाथ थोरवे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.दिलीप थोरवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सोमनाथ धनवडे यांनी मानले.