३१ जानेवारीला इंग्रजी भाषा शिक्षक कार्यशाळा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : येथील इंग्रजी टिचर असो, पंचायत समिती शिक्षण विभाग व यशकल्याणी सेवाभावी संस्था यांचे संयुक्त विद्यमाने तालुक्यातील इंग्रजी विषय शिक्षकांसाठी ३१ जानेवारीला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या डॉ. श्रृती चौधरी, डायएट वेळापूरचे विशेष समन्वयक प्रा.सुलतान चाँद शेख यांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच या कार्यशाळेत यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड. बाबूराव हिरडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांचेही भाषणे होणार आहेत.
३१ जानेवारीला यशकल्याणी सेवाभावी संस्थेमध्ये सकाळी साडेनऊ ते चार वाजेपर्यंत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे; अशी माहिती सुखदेव गिलबिले यांनी दिली. तरी या कार्यशाळेस इंग्रजी विषय शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका इंग्रजी टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष कल्याणराव साळुंके यांनी केले आहे.
