उघड्या दरवाजातून प्रवेश करून पैशाचे पाकीट चोरले..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : घराचा दरवाजा उघडा राहिल्याने चोरट्याने घरात घुसून ११ हजार रूपये असलेले पैशाचे पाकीट चोरून नेले आहे. हा प्रकार १० फेब्रुवारीला मध्यरात्री करमाळा येथील कुंकू गल्ली मध्ये घडला आहे.

यात उर्मिला हरिश पंडित (रा. कुंकू गल्ली, करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की १० फेब्रुवारीला मी माझी सर्व कामे उरकून माझ्या घरातील दिवाणवर पैशाचे पाकीट ठेवले होते व मोबाईल पाहात लोळत होते. मोबाईल पाहताना मला झोप लागली. पहाटे दीड वाजता जाग आली असता माझ्या पैशाचे पाकीट चोरट्याने चोरून नेल्याचे लक्षात आले. या पाकीटात ११ हजार रूपये रोख होते. पोलीसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!