श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजमध्ये पर्यावरण पूरक होळी उत्साहात साजरी

केम(संजय जाधव) : श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी पर्यावरण पूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. होळी या सणाचे औचित्य साधून श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी डॉ.बापूजी साळुंखे ऑक्सिजन पार्क परिसर, पोलीस स्टेशन परिसर, शालेय परिसर या भागातील प्लास्टिक पिशव्या,केर कचरा, रिकाम्या बाटल्या, रिकाम्या पुड्या विद्यार्थ्यांनी एकत्र जमा केल्या.

यानंतर प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे यांनी पर्यावरण पूरक होळीचे महत्त्व सांगितले. बदलत्या काळानुसार पर्यावरण व निसर्गाचे संतुलन राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची भीषण पाणीटंचाई व वाढते प्रदूषण यांना सामोरे जाण्यासाठी अशा उपक्रमातून पर्यावरणीय समतोल राखला जाऊ शकतो असे यावेळी सांगितले.
प्राचार्य श्री माधव बेले यांच्या मार्गदर्शनाखाली या नवोपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक श्री बापूराव सांगवे, श्री संतोष रणदिवे, श्री गणेश जाधव, श्री राजाभाऊ केंगार यांची उपस्थिती होती. यावेळी इयत्ता अकरावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.





