चिखलठाण येथील ‘इरा पब्लिक स्कूल’चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चिखलठाण नं १ (ता.करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले, इरा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रम सादर केले, या स्नेहसंमेलनासाठी चिखलठाण व परिसरातील नागरिकांनी कार्यक्रम पाहण्यासाठी गर्दी केली होती.
इरा पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेह संमेलनाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत इरा स्कूलचे अध्यक्ष डॉ.ब्रिजेश बारकुंड यांनी केले. याप्रसंगी उद्योगपती सतिशशेठ सुराणा, सरपंच धनश्री विकास गलांडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी सरपंच चंद्रकांत सरडे, दत्तात्रय सरडे, कुगाव सरपंच महादेव पोरे, शेटफळ सरपंच पांडुरंग लबडे, गुरूकुल पब्लिक स्कूलचे नितीन भोगे, महेंद्र वाकसे, सचिन पवार, राजेश शुक्ल,गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे पुढारी वार्ताहर, मिलिंद डहाके राजकुमार राऊत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या स्नेहसंमेलनासाठी विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजमहाराजांच्या राज्याभिषेक तसेच रामायण व चंद्रयान या असे विविध नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे वैशिष्टे म्हणजे सूत्रसंचालन हे इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यानी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने सादर केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.