डॉ. आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन - Saptahik Sandesh

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) -करमाळा येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ३ ते १२ एप्रिल दरम्यान यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले निबंध पाठवावेत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ही निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. बहुजन बांधवांचे लेखन व वाचन व्हावे या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

प्रथम क्रमांक मिळविणाऱ्याला प्रमोद गायकवाड यांच्या वतीने १००० रुपये, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्याला प्रसन्नजीत कांबळे यांच्याकडून ७०० रुपये, तृतीय क्रमांक येणाऱ्याला भीमराव कांबळे यांच्याकडून ५०० रुपये व उत्तेजनार्थ म्हणून ज्ञानदेव कांबळे व विश्वास कांबळे यांच्याकडून ४०० रुपये बक्षीस मिळाले आहे. १३ एप्रिलला हे बक्षीस वितरण होणार आहे. ८४८४०२९४७९ या व्हाट्सप क्रमांकावर निबंध पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!