माजी सरपंच लक्ष्मी सरवदे यांना उत्कृष्ट सामाजिक पुरस्कार प्रदान - Saptahik Sandesh

माजी सरपंच लक्ष्मी सरवदे यांना उत्कृष्ट सामाजिक पुरस्कार प्रदान

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : घारगावच्या (ता.करमाळा) माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी संजय सरवदे यांना साप्ताहिक धनगर शक्ती या मीडिया समूहाकडून २२ मार्च रोजी राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार त्यांना आळंदी (पुणे) या ठिकाणी एका सोहळ्यात वितरित करण्यात आला. ऍडव्होकेट सचिन जोरे माजी न्यायाधीश, प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य व मा. श्री राहुल शेठ चिताळकर पाटील माजी नगराध्यक्ष नगरपरिषद आळंदी सौ कल्याणी वाघमोडे धनगर शक्ती संपादक आकाश पुजारी यांच्या हस्ते सन्मान पत्र, सन्मानचिन्ह आणि मिडल देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार कार्यक्रम प्रसंगी संपादक धनगर शक्ती माननीय आकाश पुजारी, कल्याणी ताई वाघमोडे, संजय सरवदे, देवीदास सरवदे अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते‌‌.पुरस्कार प्राप्त झाल्याने घारगावचे माजी सरपंच किरण दादा पाटील, माजी सरपंच अनिता राजेंद्र भोसले, माजी उपसरपंच सतीश अंगद पवार, माजी सरपंच सौ लोचना नागनाथ पाटील विद्यमान उपसरपंच दत्तात्रय मस्तुद, विद्यमान सरपंच आशाबाई रामलिंग देशमुखे, ग्रामपंचायत सदस्या कविता होगले, माजी सरपंच कल्याण दादा होगले, विजय शिंदे, लक्ष्मण पवार समस्त घारगावकर ग्रामस्थ व करमाळा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष एडवोकेट प्राध्यापक शशिकांत नरूटे, शिवछत्रपती दूध संकलन केंद्र चेअरमन श्री काशिनाथ होगले व तालुक्यातील सर्व मित्र परिवारा बरोबरच आप्तेष्टांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने सर्व समाज उपयोगी आम्ही ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे सर्व सहकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य ,माजी सरपंच यांच्या सहकार्याने करत असतो.त्यांच्या या सामाजिक कामात पती संजय सरवदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असते असे लक्ष्मी सरवदे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!