माजी सैनिक अप्पाराव कदम यांच्यावर उपचार सुरू – सैनिक संघटनेकडून 30 हजाराची मदत – धनीकांना मदतीचे आवाहन..
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.1: तालुक्यातील BSF चे माजी सैनिक आप्पाराव कदम जे पेन्शन वर आल्या नंतर ते मेस्को मध्ये करमाळा येथे एस टी डेपो मध्ये ड्युटी करत होते आणि त्यांना ड्युटीवर असताना 10 दिवसापूर्वी ब्रेन हॅमरेज चा अटॅक आला आहे. त्यांना तातडीने पुणे येथे KEM हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. त्यांचेवर उपचार सुरू आहेत.
सध्या त्यांच्या उपचारासाठी 8 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी संघटनेच्या वतीने 30001 रूपये दिले आहेत. यासाठी तालुक्यातील सह्रदयी व्यक्तींनी आर्थिक मदत करावी असे त्यांनी अवाहन केले आहे.
अप्पाराव कदम यांची तब्येत आत्ता तशी बरी आहे पण आत्ता पर्यंत त्यांचे तीन ऑपरेशन झाले आहेत. 8 लाख रुपये खर्च आला आहे,अजून काही दिवस उपचार सुरू ठेवावे लागतील. त्यामुळे त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटनेकडून 30001 रूपये मदत केली आहे., तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन एकजूट होऊन काही तरी मदत केली पाहिजे , तरी सर्वांनी ज्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी आर्थिकदृष्ट्या मदत करावी, ही मदत संघटनेकडे दिली तरी ती कदम कुटुंबापर्यंत पोहोचेल, असे आवाहन आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा तालुका अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी केले आहे. संपर्क मो.नं.8275756522 हा आहे.