उमरड येथे माजी विध्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

उमरड (नंदकिशोर वलटे यांजकडून) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड येथे माजी विध्यार्थी स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याची सुरुवात मेजर संदिप बदे, शालेय समितीचे अध्यक्ष संजय कोठावळे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूराव चोरमले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत भिल यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
या मेळाव्याचे प्रास्ताविक अनिल यादव गुरुजी यांनी केले व शाळेची जडणघडण थोडक्यात सांगितली. माजी विद्यार्थी प्रा. नंदकिशोर वलटे, बापूराव चोरमले, श्रीकांत मारकड यांनी शाळेबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.दुसऱ्या सत्रात सर्व माजी विद्यार्थ्यांना घेऊन संगीत खुर्चीचा मनोरंजक खेळ खेळला गेला. यात विजेत्यांचा सन्मान केला गेला.

त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेतर्फे अल्पोपहार देण्यात आला. या मेळाव्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल माजी विद्यार्थी किशोर गोडगे यांनी शाळेसाठी रोख पाच हजार रुपयांची देणगी दिली.शाळेने त्यांचा सत्कार करून आभार मानले. या कार्यक्रमास प्रामुख्याने प्रमोद कुलकर्णी,मोहन चौधरी, लहू कोठावळे, जनार्दन मारकड,समाधान मारकड, विकास बदे,चांगदेव कोठावळे, समाधान वलटे, चांगदेव चौधरी, महेंद्र कोठावळे, चांगदेव,कोठावळे, मुकेश बदे,संतोष पडवळे इत्यादी माजी विध्यार्थी हजर होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल यादव यांनी केले तर नियोजन भोसले गुरुजी,राऊत गुरुजी केले.




