उद्या शेटफळ येथे शेतकरी मेळावा- तज्ञ मार्गदर्शन करणार -

उद्या शेटफळ येथे शेतकरी मेळावा- तज्ञ मार्गदर्शन करणार

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.२३:  शेटफळ येथील नागराज मशिनरी शेती मॉलच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच लोकविकास फार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने उद्या मंगळवार( ता.२४ ) रोजी सकाळी १०.३० वाजता नागराज मशिनरी शेती मॉल, शेटफळ (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे भव्य शेतकरी मेळावा व गुणवंत शेतकरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार असून विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

मेळाव्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी  अंजना कृष्णा (IPS), तहसीलदार करमाळा शिल्पा ठोंबरे, उपविभागीय कृषी अधिकारी  संजय वाकडे, धाराशिव येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी  राजेंद्र नेटके, नव्याने नियुक्त उपविभागीय कृषी अधिकारी  प्रतीक्षा शिंदे-कवडे आदी मान्यवर तसेच ग्रामसुधार समिती चे अध्यक्ष डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे, ह.भ.प. विठ्ठल पाटील महाराज, युनियन बँक क्षेत्रीय कार्यालयाचे डेप्युटी जनरल मॅनेजर सुनील कुमार यादव, कृषी तज्ज्ञ किरण पाटील (जैन इरिगेशन, सोलापूर), के.डी. एक्सपोर्टचे  किरण डोके तसेच शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी सोमनाथ हुलगे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्री. वैभव वसंतराव पोळ व लोकविकास फार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!