पैगंबर जयंतीनिमित्त करमाळ्यात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर संपन्न -

पैगंबर जयंतीनिमित्त करमाळ्यात नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर संपन्न

0

करमाळा : हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त २७ ऑगस्ट रोजी करमाळ्यात नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशन, सकल मुस्लिम समाज करमाळा आणि तपश्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन श्रेणिकशेठ खाटेर यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “आजवर या उपक्रमाच्या माध्यमातून सहा हजारांहून अधिक रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. करमाळा शहर तसेच ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना याचा लाभ मिळाला आहे. गणेशोत्सवाचे आगमन आणि पैगंबर जयंती या दोन्ही निमित्तांचा दुग्धशर्करा योग आज या शिबिराद्वारे साधला आहे.

या कार्यक्रमाला सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, रोहित पवार फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष मुस्तकीम दादा पठाण, रमजान बेग, सुरज शेख, इकबाल शेख, अलिम खान, इम्तियाज पठाण, जावेद सय्यद, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख, फिरोज बेग, कलंदर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!