प्रसिद्ध व्यापारी गौतमचंद लुंकड यांचे निधन..

करमाळा, ता. २२ : जेऊर येथील ज्येष्ठ व नामवंत व्यापारी गौतमचंद उत्तमचंद लुंकड (वय ८७) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने व्यापारी क्षेत्रासह समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गौतमचंद लुंकड हे जुन्या पिढीतील प्रतिष्ठित व्यापारी असून, त्यांच्या सौम्य स्वभावामुळे ,समंजस वर्तनामुळे ते सर्वत्र परिचित होते. त्यांचा व्यापार, सामाजिक व जैन पारिवारिक वर्तुळात मोठा वावर होता. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कापड व्यापारी अभय लुंकड, स्टेशनरी व्यापारी भूषण शेठ लुंकड, तसेच पुण्यातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. वैभव लुंकड यांचे ते वडील होत. त्यांच्यावर आज (रविवार) दुपारी २ वाजता जेऊर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संबंधित लेख : गौतमचंद लुंकड : एक संयमी व्यक्तिमत्व






