पोथरे येथे इ.7 वीच्या विद्यार्थी वर्गाचा निरोप समारंभ संपन्न... -

पोथरे येथे इ.7 वीच्या विद्यार्थी वर्गाचा निरोप समारंभ संपन्न…

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पोथरे (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे इ. 7 वी विद्यार्थी वर्गाचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, हा समारंभ वर्गशिक्षिका शगुफ्ता हुंडेकरी (शेख) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बप्पासाहेब शिंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच प्रतिनिधी हरिश्चंद्र झिंजाडे, विद्यमान सरपंच धनंजय झिंजाडे, ग्रामपंचायत सदस्य रघुवीर जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, पालक कृष्णा जाधव व राजेंद्र शिंदे सह सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यी व शिक्षकांमधील जून्या आठवणी याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केल्या. अध्यक्षीय भाषणात बप्पा शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत तालुका स्तरावरुन ते जिल्हा स्तरावर विविध स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल व त्यांनी अभ्यासात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी भविष्यात देखील अशीच उंच उंच भरारी घेऊन चांगले आधिकारी बनवून गावाचे, आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे. यावेळी उत्कृष्ट आदर्श वर्गशिक्षिका श्रीम.शगुफ्ता हुंडेकरी यांचा पालक सौ.माया जाधव आणि सौ.नूतन शिंदे यांनी सत्कार केला.

आभार प्रदर्शन कु.शिवानी झिंजाडे व कु.अनुजा शिंदे यांनी मांडले. या कार्यक्रमाची सांगता वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बक्षिसाच्या शिल्लक रकमेतून शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यार्थीनी कु.समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिने केले. याप्रसंगी अनेक मान्यवर विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!