मराठी विषयाचे विभागप्रमुख प्रा.प्रदिप मोहिते यांचा चव्हाण महाविद्यालयात निरोप समारंभ संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील मराठी विषयाचे विभागप्रमुख प्रा.प्रदिप मोहिते यांचा निरोप समारंभ 1 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये संपन्न झाला.
या प्रसंगी संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व सर्व मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने प्रा.प्रदिप मोहिते यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभ प्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, प्रा.मोहिते सर हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून कोणत्याही क्षेत्रात अतिशय नैपुण्यपणे काम करण्याची त्यांची तयारी असते. यावेळी तहसीलदार सुषमा पैकेकरी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोदजी झिंजाडे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबूराव हिरडे, किलकिले सर , प्रा.सौ.संगिता मोहिते-पैकेकरी, विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय प्राचार्य डॉ. महेंद्र कदम,डॉ. कवी राजेंद्र दास, मदार चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर या मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले.
या सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच माजी विद्यार्थ्यांनी प्रा.मोहिते सरांविषयीचे आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील यांनी प्रा.मोहिते सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रा.मोहिते यांनी सत्कारास उत्तर आपले मनोगत व्यक्त करून दिले. तसेच महाविद्यालय व संस्थेविषयी ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी यशवंत परिवारातील सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.