जेऊर येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंच मेळावा संपन्न
करमाळा (दि.२९) – जेऊर (ता.करमाळा) येथील कृषी संशोधन केंद्र येथे आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी शेतकरी शास्त्रज्ञ मंच मेळावा संपन्न झाला.
यावेळी डॉक्टर एस .एस. नवले (प्रभारी अधिकारी; कृषी संशोधन केंद्र जेऊर) यांनी शेतकऱ्यांना जेऊर येथील कृषी संशोधन केंद्र येथे चालणाऱ्या विविध संशोधन प्रयोगाची तसेच सोयाबीन पिकाच्या बीजउत्पादनाची माहिती दिली. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या हायब्रीड नेपियर या चारा पिकाचे बियाणे मोफत वाटण्यात आले. तसेच प्रक्षेत्रावर असणाऱ्या विविध प्रयोग, सोयाबीन बीजोउत्पादन प्लॉटवर शिवार फेरी राबवण्यात आली. यावेळी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष विठ्ठल केकान तसेच जेऊर परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. रविंद्र लोखंडे( कृषी सहाय्यक) यांनी केले.