ट्रान्सफॉर्मर बसवून न दिल्यास आत्मदहन करणार – शेतकऱ्याचा वीज मंडळाला इशारा
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – H.V.D.S. या स्किम अंतर्गत मंजूर झालेला ट्रान्सफॉर्मर त्वरित बसवून द्यावा अन्यथा जेऊर वीज मंडळाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा केम येथील शेतकऱ्याने दिला आहे.
धनंजय नाईकनवरे असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी उपकार्यकारी अभियंता म.रा.वि. मंडळ जेऊर यांना त्यांनी लेखी निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, H.V.D.S. या स्किम अंतर्गत केम परिसरात जी कामे मंजूर झाली आहेत त्या अंतर्गत गणेश नाईकनवरे व धनंजय नाईकनवरे या नावे दोन ट्रान्सफॉर्मर मंजूर झालेले असून कंदर वीज मंडळातील संबंधित अधिकारी हे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात नकार देत आहे.
सध्या बेंद भागातील नामू-दामु वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने माझ्या द्राक्ष बागेला पाणी उपलब्ध नाही आहे. यामुळे माझे मोठे नुकसान होणार आहे तरी आमचे मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर त्वरित बसवून द्यावेत अन्यथा मी जेऊर वीज मंडळाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असा इशारा नाईकनवरे यांनी दिला आहे.
एल.टि.लाइन जवळ असल्याने त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर देता येत नाही असे कंदर वीज मंडळाकडून सांगण्यात आले आहे. एल.टि. लाईन जवळ असली तर ट्रान्सफॉर्मर देता येत नसेल तर गावात अनेक ट्रान्सफॉर्मर कसे काय बसविले आहेत याची चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया धनजंय नाईकनवरे यांनी दिली.