विकसित भारत पुर्व यात्रेचा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा – अमरजित साळुंके
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – भारत सरकारच्या योजनांचे लाभ लक्ष्यीत लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचावेत या उद्देशाने देशातील प्रत्येक जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा आजचा चौथा दिवस शेलगाव आणि वांगी १ येथे दोन सत्रात झाला असल्याची माहिती भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अमरजित साळुंके यांनी दिली.
दिनांक 23 नोव्हेंबर पासून सुरू झालेली यात्रा 15 डिसेंबर रोजी समाप्त होणार आहे. या कालावधीत प्रत्येक दिवशी दोन गावांमध्ये दररोज सकाळी ११ वा. एका गावात व दुपारी २ वा. नंतर दुसऱ्या गावात यात्रा पोहोचणार आहे. गावातील प्रत्येक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माहितीसाठी विकसित पूर्व भारत यात्रा आपल्या गावामध्ये केव्हा येणार आहे याची संबंधित ग्रामसेवक व पदाधिकारी यांचेकडून माहिती घ्यावी असेही श्री साळुंखे यांनी म्हटले आहे.
करमाळा तालुक्यातील गावांमध्ये भारत सरकारच्या विविध योजनांच्या बाबत माहीती, ड्रोन चा आधुनिक शेतीसाठी वापर यांसह इतरही बऱ्याच नावीन्यपूर्ण योजनांबाबत हा नव उपक्रम राबविला जात आहे.
या वेळी भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग करमाळा चे दत्तात्रय देशमुख, विशाल पाटील, ॲड.शशीकांत नरूटे, ज्ञानेश्र्वर खाटमोडे, किरण वाळुंजकर, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.