शेलगाव (वा) येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगीक संलग्नता कार्यक्रम अंतर्गत सद्गुरु कृषी महाविदयालय मिरजगाव यांच्या वतीने शेलगाव (वां), ता. करमाळा येथे शेतकरी मेळावा झाला. शेतकऱ्यांना केळी लागवड व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले, शेतकऱ्याना केळी लागवड करताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना व मार्गदर्शन दिले.
या कार्यक्रमाचे प्रमुख श्री अमीर शेख यांनी केळी लागवड व व्यवस्थापन यावर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यात किरण पाटील, किरण डोके यांनी मार्गदर्शन केले.या वेळी शैक्षणिक कार्यक्रमासाठी शेलगावचे सरपंच अमर ठोंबरे उपसरपंच समाधान जाधव, हनुमंत देशमुख, वांगी 3 चे सरपंच श्री मयूर रोकडे, पांगरे चे सरपंच श्री दत्तात्रय सोनवणे , श्री सचिन पिसाळ,विठ्ठल केकान, नवनाथ केकान उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कृषीदुताना संस्थाचे संस्थापक डॉ शंकरराव नेवसे, अध्यक्षा सौ कल्याणीताई नेवसे, राजेंद्र गोरे, सखाराम राजळे, समन्वयक सुरज जाधव, प्राचार्य रामदास बिटेसर, यादवसर , डॉ एम जी थालकर व सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



