वैदिक खतांच्या वापराने शेतकऱ्यांचीही होणार स्वप्नपूर्ती - गणेश करे-पाटील - Saptahik Sandesh

वैदिक खतांच्या वापराने शेतकऱ्यांचीही होणार स्वप्नपूर्ती – गणेश करे-पाटील

करमाळा : वैदिक खतांचा शेतीसाठी वापर केल्यास शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होवून शेतकऱ्यांचीही निश्चितच स्वप्नपुर्ती होणार असल्याचे मत यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी सरपडोह येथे व्यक्त केले. सरपडोह(ता.करमाळा) येथील स्वप्नपुर्ती उद्योगसमुहाच्या वतिने स्वप्नपुर्ती कृषी सेवा केंद्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सरपडोह येथील युवा शेतकरी बांधवांनी स्वप्नपूर्ती उद्योग समुहाच्या माध्यमातून एकत्र येत रासायनीक व जैविक खतांच्या बेसुमार वापराला फाटा देत यापुढे मात्र वैदिक (साँईल चार्जर टेक्नाँलाँजी) चा वापर करण्याचे ठरविले असून हा बदल केल्यास मातीची सुपिकता ही कायम राहणार असुन रोगांचा प्रदुर्भाव कमी होवून उत्पन्नात वाढ होणार आहे.

या शुभारंभाप्रसंगी गटविकास अधिकारी मनोज राऊत, राजेरावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष डाँ. विकास वीर , आदर्श ग्रामसेवक व आरोग्य सल्लागार महेश काळे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. या वैदिक (साँईल चार्जर टेक्नाँलाँजी) चे जिल्हाप्रमुख डाँ. पंडितकुमार साळुंके , सोमनाथ वरकड यांनी शेती वाचविण्यासाठी वैदिक खतांचा वापर करण्याविषयीचे मार्गर्शन केले.

यावेळी ग्रामस्थ व सर्पनाथ सेवा मंडळ पुणेग्रुपच्या वतिने श्री. गणेश करे-पाटील यांना मागील आठवड्यात कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार मिळाल्या बद्दल सन्मानीत करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी सहाय्यक सचिन सरडे, सरपडोहच्या सरपंच सौ.मालनताई वाळके, उपसरपंच श्री.नाथाराव रंदवे, जिल्हा दुध संघाच्या संचालिका श्रीमती अलकाताई चौगुले, सरपडोह वि.का.से. सोसायटीचे चेअरमन श्री लक्ष्मण बापू खराडे , भारत हास्कूलचे प्रा. श्री. औदुंबर पारेकर सर, ग्रामसेवक श्री.आबासाहेब खाडे भाऊसाहेब, केम येथील गोसेवक श्री. परमेश्वर तळेकर, मुख्याध्यापक श्री. नारायण डौले, श्री.आरणे महाराज व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!