अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून वंजारवाडीतील शेतकरी वंचित – संतप्त शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा


करमाळा (संदेश प्रतिनिधी) : मागील वर्षी ऑगस्ट २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते. यानंतर शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासन करून तब्बल एक वर्षानंतर याद्या ऑनलाईन अपलोड करून करमाळा तालुक्यातील ७ कोटी ६० लाख अनुदान वितरित केले आहे. परंतु सदर याद्या अपलोड करताना करमाळा तहसील प्रशासनाने वंजारवाडी मधील शेतकऱ्यांचे पंचनामे केलेली यादी ऑनलाईन प्रशासनाकडून अपलोड केली गेलेली नाही.

प्रशासनाने केलेल्या हलगर्जीपणामुळे वंजारवाडी मधील सर्व बाधित शेतकऱ्यांना पंचनामे झाले असताना सुद्धा व ते अनुदान मिळण्यास पात्र असताना सुद्धा केवळ प्रशासनाच्या ढिसाळ व निष्काळजीपणामुळे वंजारवाडी तील शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे वंजारवाडी मधील शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दोन दिवसात महसूल प्रशासनाने कार्यवाही करून अनुदान वितरित न केल्यास शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर पासून करमाळा तहसील कार्यालयासमोर वंजारवाडी मधील सर्व शेतकरी महिला व मुल व जनावरासमवेत करमाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत . अशा प्रकारचा इशारा वंजारवाडी मधील शेतकरी माऊली बिनवडे अनिल बिनवडे निलेश राख , संतोष बिनवडे भुजंग गीते अंबादास बिनवडे सुभाष बिनवडे दत्तात्रय बिनवडे राजाराम बिनवडे वैभव केकान व वंजारवाडीतील सर्व ग्रामस्थांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी करमाळा तहसील कार्यालयात जाऊन तक्रार केल्यानंतर आम्ही ही यादी दुरुस्त करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयत्न करू असे आश्वासन देण्यात आले.

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 60 लाख निधी मंजूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!