शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास निर्मितीबाबत डॉ.जगताप यांचेमार्फत प्रशिक्षण संपन्न..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : चिखलठाण नं 1 (ता.करमाळा) येथे कृशल ओपन कॉमर्स कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय व मुरघास निर्मिती बाबत नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.श्रीकृष्ण जगताप यांनी केले होते. यावेळी कृशल ओपन कॉमर्स टीम लीडर अच्युत गोळे व मुरघास तज्ञ श्रीमंत झाकणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच याप्रसंगी कुगाव येथील श्रीकांत बळीराम सरडे यांच्या गाई दगावल्यामुळे कृशल ओपन कॉमर्स मार्फत 50,000 रुपयांचा धनादेश याप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, शंभूराजे जगताप, अभयसिंहराजे भोसले, चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे,सहयाद्री ऍग्रो डेअरी चे रूट ऑफिसर हेमंत बन, राजेंद्र बारकुंड, सर्व दूध संस्थांचे चेअरमन व कुगाव, चिखलठाण, शेटफळ पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Adverties

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!