मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर फारूक जमादार यांचे उपोषण मागे... - Saptahik Sandesh

मुख्याधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर फारूक जमादार यांचे उपोषण मागे…


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील कामे वर्कऑर्डर असतानाही रखडली होती, ठेकेदार काम करत नसल्यामुळे करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते फारूक जमादार आज (ता.४) करमाळा नगरपालिकेच्या समोर आमरण उपोषणास बसले होते, परंतु करमाळा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या वतीने अभियंता आकाश वाघमारे , कार्यालयीन अधीक्षक बदे यांनी लेखी आश्वासन दिल्याने फारूक जमादार यांनी दुपारी अडीच वाजता उपोषण सोडले.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, करमाळा नगरपालिकेच्या ठेकेदारावर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात यावी व संजय कुंभार ते कत्तलखाना रस्ता डांबरीकरण करणे तसेच चिंचकर घर ते स्वामी समर्थ मंदिर रस्ता डांबरीकरण करणे व मडके घर ते स्वामी समर्थ मंदिर गटार बांधकाम करणे ही कामे गेली दोन ते तीन वर्षापासून ठेकेदारांना कामाची वर्कऑडर देऊनही ठेकेदार काम करत नव्हते, त्यामुळे आज (ता.४) सकाळी अकरा वाजता करमाळा नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते, परंतु आपण मागणी केलेले सदरचे काम दोन दिवसापूर्वी चालू केलेले आहे आणि नगरपालिका ठेकेदारावर योग्य ती दंडात्मक कारवाई करील असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

या उपोषणाला पाठिंबा म्हणून सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गणेश चिवटे, काँग्रेस नेते सुनील बापू सावंत राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतराव मांढरे पाटील नगरसेवक संजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आजाद शेख ,शिवसेनेचे शहरप्रमुख संजय शिंदे ,मनसेचे अध्यक्ष संजय घोलप , लक्ष्मणराव भोसले माजी नगरसेवक सचिन घोलप ,भाजपचे संजय घोरपडे, जिशांन कबीर मुस्तकीन पठाण, साजिद बेग ,जावेद शेख ,अलीम खान, सुरेश शिंदे ,रामा कुंभार नासीर कबीर, दादासाहेब इंदलकर,सागर गायकवाड, सद्दाम नालबंद, समीर सय्यद ,बंडू परदेशी ,असलम नालबंद ,मजहर नालबंद ,राजू नालबंद,शकील शेख,वाजीद शेख,आलीम शेख, महादेव भंडारे ,आसिफ नालबंद ,राजु वीर भैय्या पठाण आदी जणांनी पाठींबा दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!