नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार – भाजप-शिवसेना-शहर विकास आघाडीसह राष्ट्रीय समाज पक्ष व अपक्ष रिंगणात

करमाळा,ता.21:करमाळा नगरपालिका निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत (21 नोव्हेंबर) तीन अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी पंचरंगी लढत होणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना- शहर विकास आघाडीसह राष्ट्रीय समाज पक्ष व अपक्ष रिंगणात राहिले आहेत.

करमाळा नगराध्यक्ष पदासाठी यावेळी निवडणूक ही पूर्णपणे ‘पक्षीय’ रंगात रंगणार आहे. सत्ताधारी गटात शिवसेना – भाजपा – सावंत गटाच्या शहर विकास आघाडी असा सामना रंगणार आहे. या बरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाने प्रथमच उमेदवार दिला आहे.

भाजपाकडून दोन अर्ज
जयश्री विलास घुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो आज मागे घेतला आहे. त्यामुळे भाजपा कडून सुनिता कन्हैयालाल देवी या तर शिवसेनेकडून दोन अर्ज दाखल होते. त्यापैकी संगीता श्रेणिक खाटेर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून महानंदा जयवंतराव जगताप यांचा सावंत गटाच्या शहर विकास आघाडीकडून मोहिनी संजय सावंत राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) कडून भावना भद्रेश गांधी तर अपक्ष प्रियंका सिद्धांत वाघमारे यांचा अशा प्रकारे एकूण पाच उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले आहेत. त्यामुळे करमाळा नगराध्यक्ष पदाची ही बहु-उमेदवारांची लढत यंदा विशेष लक्षवेधी ठरणार हे निश्चित.


