करमाळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा - पाच जणांना रंगेहाथ पकडले -

करमाळ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा – पाच जणांना रंगेहाथ पकडले

0


करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.२९: वीट हद्दीतील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर करमाळा पोलिसांनी धाडसी कारवाई करत पाच जणांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली.

पोलीस कॉन्स्टेबल रविराज धोंडीराम गटके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग सुरू असताना मोजे वीट येथील लक्ष्मण दिनकर कांबळे यांच्या शेतात झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर तिथे छापा टाकला असता, तिथे लक्ष्मण दिनकर कांबळे ,रा. वीट, शिवाजी काशिनाथ जाधव, रा. झरे,बाजीराव अरुण गिरी रा. उमरड,बाळू अंबादास ठेंबरे, रा.अंजनडोह, संदीप बाळासाहेब बदे, रा. उमरड, हे जुगार खेळताना आढळून आले.

त्यावेळी त्यांच्याकडून रु.२२२० रोख रक्कम, एक ५२ पत्त्यांचा डाव व एक निळ्या रंगाची चादर असा मुद्देमाल जप्त केला आहे. या संशयित आरोपींवर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!