पाच वर्षीय चिमुकल्याने केला रमजान महिन्यातील एक दिवसाचा कडक उपवास

करमाळा(दि.१०) : करमाळा तालुक्यातील कंदर येथील मुनिस जहागीरदार यांच्या अवघ्या पाच वर्षीय चिमुकल्याने रमजान महिन्यातील एक दिवसाचा कडक असा उपवास अर्थात रोजा पूर्ण केला आहे
इस्लाम धर्मातील पवित्र आणि संयम, प्रेम, शांततेचे प्रतीक असणाऱ्या रमजान महिन्याची नुकतीच सुरुवात झाली असून कंदर येथील मुबीन जहागीरदार यांचे चिरंजीव तसेच जे बी फ्रुट सप्लायर्स चे व्यवस्थापक मकसूद उर्फ बाबुभाई जहागीरदार यांचे पुतणे मुनिस जहागीरदार या अवघ्या पाच वर्षीय चिमुकल्याने एक दिवसाचा रमजानचा पहिला उपवास रोजा पूर्ण केला आहे रमजान मध्ये तब्बल महिनाभर कडक रोजे केले जातात आणि उन्हाळ्यात यंदा रमजान चे उपवास सुरू झाले असले तरी घरातील मोठ्या पासून ते बाल गोपाल यांच्यामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे
मुनिस जहागीरदार हा टेंभुर्णी येथील इंग्लिश स्कूल मध्ये शिकत आहे मुनिस जहागीरदार याने आपला पहिला रोजा कंदर येथील जामा मशीद मध्ये सदरचा रोजा सोडला यावेळी हाफिज अराफत मौलाणा, तसेच सरपंच शब्बीर मुलाणी, दिलावर शेख, असिम जहागीरदार, अश्फाक तांबोळी, मुबीन जहागीरदार, मिनाज सय्यद, मिजबा सय्यद, मुबारक शेख, अब्दुल पठाण, दाऊद मुलाणी, मकसूद जहागीरदार, इलाई हवालदार, इत्यादी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
ऐन कडक उन्हाळ्याच्या महिन्यात अवघ्या पाच वर्षीय मुनिस जहागीरदार या चिमुकल्याने एक दिवसाचा रोजा पूर्ण केल्याने त्याचे कंदर तसेच परिसरात विशेष कौतुक केले जात आहे.





