पोथरे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींकडून ध्वजारोहण संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोथरे (ता.करमाळा) प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण टॅलेंट हंट स्पर्धेत यश मिळविणाऱ्या पोथरे येथील दोन विद्यार्थीनी कु.समृद्धी राज झिंजाडे व कु.शिवानी राजेंद्र झिंजाडे यांच्या हस्ते पोथरे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण करण्यात आले.
सरपंच धनंजयकाका झिंजाडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बप्पासाहेब शिंदे यांनी गावातील विद्यार्थ्यांवर चांगल्या प्रकारचे मूल्यसंस्कार व्हावेत, गावात एक आदर्श निर्माण व्हावा म्हणून जिल्हा परिषद सोलापूरने राबवलेल्या टॅलेंट हंट स्पर्धेत जिल्हास्तर गाजवलेल्या जि.प प्रा.केंद्रशाळा पोथरे येथील दोन विद्यार्थीनी कु. समृद्धी राज झिंजाडे व कु. शिवानी राजेंद्र झिंजाडे यांच्या हस्ते ग्रा.पं .पोथरे व जि .प .शाळा केंद्र, पोथरे ध्वजारोहण करून एक नवा पायंडा पाडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यावेळी “बेटी बचाओ… बेटी पढाओ…”, “हमारी बेटी… हमारे गाँव का अभिमान…” अशा घोषणा देऊन पोथरे येथे “बालिका सप्ताह” अभियान एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
या अनोख्या उपक्रमाबदल पोथरे ग्रामस्थ व मुख्याध्यापक (केंद्र शाळा पोथरे) यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान केला व आभार मानले . असा हा नावीन्यपूर्ण आणि सर्वांनीच अनुकरण करण्यासारखा उपक्रम राबविल्याबद्दल सरपंच मा. धनंजय काका झिंजाडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. बप्पासाहेब शिंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

