उत्तरेश्वर मंदिरातील शिवलिंगाला करण्यात आली सुंदर फुलांची सजावट
केम (संजय जाधव) – केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरामध्ये सोमवार निमित्त शिवलिंगाची वेगवेगळया रूपात सजावट केली जाते. त्या प्रमाणे आज सोमवारी सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली होती. शिवलिंगाच्या पाठिममागे कुंकवाची रांगोळी घालण्यात आली. हि सजावट मंदिराचे पुजारी समाधान गुरव यांनी केली. श्री च्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हि सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.श्री उत्तरेश्वर देवस्थान कमेटिचे चेअरमन दादासाहेब गोडसे यानी या सजावटिचे कौतूक केले.