शौर्यदिनी कोरेगाव भीमात करमाळ्याच्या डॉ. आंबेडकरवादी चळवळीकडून भिम अनुयायांना अन्नदान

करमाळा : करमाळा येथील डॉ. आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटनेच्या वतीने शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा (पुणे) येथे येणाऱ्या भिम अनुयायांसाठी मोफत अन्नदान करण्यात आले.

विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे येतात. या अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी डॉ. आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. १ तारखेला अन्नदानासाठी आवश्यक साहित्य घेऊन सदस्य कोरेगाव भीमा येथे उपस्थित होते. यापुढील काळातही हा सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या सदस्यांनी दिली.

या अन्नदान उपक्रमासाठी सुनिल खरात, राजू कांबळे, बाळू कसबे, दत्तात्रय कांबळे, सुशांत कांबळे, संजय कांबळे (आचारी), शहाजी लांडगे, रोहित कांबळे, मंगेश समिंदर, केतन कांबळे, महादेव थोरात, सुरज कांबळे, सुशील खरात, अजिंक्य कांबळे, शुभम पगारे, अजय कांबळे, प्रकाश कांबळे, पियुष कांबळे, सिद्धार्थ कांबळे, विशाल खरात, कविराज कांबळे, आनंद कटारे, विकी कांबळे, विशाल कांबळे, आशिष कांबळे, अनिकेत कांबळे, संघर्ष कांबळे, पिल्या कांबळे, आदित्य कुंभार, युवराज कांबळे, यश कांबळे व चिक्या कांबळे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले


