पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम समाजातर्फे ज्येष्ठ निराधारांना अन्नदान

करमाळा : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करमाळा येथील निराधार ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान करण्यात आले. हे अन्नदान श्रीराम प्रतिष्ठानच्या कार्यालयात पार पडले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे व मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे यांच्या हस्ते अन्नदान वाटप झाले. यावेळी सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, रोप फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, सोहेल पठाण, उमरान मुलानी, सचिव रमजान बेग, अलीम खान आदी उपस्थित होते.

आयशा मस्जिदचे मुफ्ती अबूरेहान यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पैगंबर मोहम्मद यांनी जगाला द्वेषाला उत्तर प्रेमाने द्या, जातीभेद दूर करा हा संदेश दिला. स्त्रीभ्रूण हत्या पाप आहे, विधवांच्या पुनर्विवाहाला त्यांनी मान्यता दिली, महिलांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले. पैगंबर हे केवळ मुस्लिमांचे नसून रहमतल लिल आलमीन या पदवीप्रमाणे ते संपूर्ण मानवजातीसाठी करुणामय मार्गदर्शक आहेत, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला सुरज शेख, इकबाल शेख, जावेद सय्यद, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख, चाँद बेग, फिरोज बेग, कलंदर शेख, कय्युम मदारी, अक्रम मदारी, दाऊद मदारी आदींची उपस्थिती होती.


