करमाळ्यात प्रथमच महिलांसाठी पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी


करमाळा (संदेश प्रतिनिधी) : शहरामध्ये महिलांसाठी पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली .या आगळ्यावेगळ्या उत्सवामध्ये हजारो महिला उस्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये करमाळ्याच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलांसाठी अत्यंत सुरक्षित वातावरणामध्ये रंगपंचमीचा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये 1000 ते 1200 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे वेगळेपण असे की, या रंगपंचमीमध्ये रंग नैसर्गिक आणि कोरडे वापरण्यात आले होते. पाण्याचा पूर्णपणे वापर टाळण्यात आला होता. यामधून ‘जल है, तो कल है!’ हा संदेश देण्यात आला. यामध्ये वापरण्यात आलेले रंग पूर्णपणे सुरक्षित आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवणारे होते .हा कार्यक्रम महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये पार पाडला गेला. या कार्यक्रमांमध्ये लहान मुलींपासून वयोवृद्ध महिलेपर्यंत सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाच्या आयोजन बद्दल शंभुराजे जगताप यांचे कौतुक होत आहे. महिलांसाठी पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली .या आगळ्यावेगळ्या उत्सवामध्ये हजारो महिला उस्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.

संबंधीत कार्यक्रमाची व्हिडिओ

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निखिल चांदगुडे ,प्रशांत पवार, ओंकार घोंगडे ,सलमान शेख, सुरेखा परदेशी, सौ प्रज्ञा आव्हाड, रेणुका राऊत, पुष्पा शिंदे रेखा परदेशी ,वासुदेव ढोके, प्रशांत शिंदे ,अक्षय शेळके, विशाल परदेशी, वनराज घोलप, सिद्धेश्वर लष्कर यांनी सहभाग नोंदवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!