करमाळा शहरात प्रथमच मुलामुलींसाठी ४ जून रोजी जलतरण स्पर्धेचे आयोजन.. -

करमाळा शहरात प्रथमच मुलामुलींसाठी ४ जून रोजी जलतरण स्पर्धेचे आयोजन..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात प्रथमच मुलामुलींसाठी ४ जून रोजी जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधिक्षक मिठू जगदाळे, महावितरणचे सहाय्यक अभियंता रघुनाथ शिंदे, सुशांत स्विमिंग क्लबचे संजय मोरे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे यांचे हस्ते ४ जून रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. ही स्पर्धा सुशांत स्विमिंग, राजयोग हॉटेल, करमाळा येथे होणार आहे. पाच ते नऊ वर्षे बाल गटासाठी प्रथम बक्षीस २५०० रूपये, द्वित्तीय बक्षीस १५०० रूपये, तृतीय बक्षीस १००० रूपये ठेवण्यात आले आहे. दहा ते चौदा वर्षे लहान गटासाठी प्रथम बक्षीस ३००० रूपये, द्वित्तीय बक्षीस २००० रूपये, तृतीय बक्षीस १००० रूपये ठेवण्यात आले असून पंधरा ते सतरा वर्षे मोठ्या गटासाठी प्रथम बक्षीस ५००० रूपये, द्वित्तीय बक्षीस ३००० रूपये, तृतीय बक्षीस २००० रूपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क ५० रूपये ठेवण्यात आले असून, या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे तालुका अध्यक्ष संजय घोलप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!