माजी सभापती अतुल पाटील यांना ‘मल्हाररत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल जेऊर ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 33 व्या जयंती निमित्त पुण्यश्लोक फाऊंडेशनच्या वतीने रविवारी पंडित नेहरू सांस्कृतिक सभागृह पुणे येथे ‘मल्हाररत्न पुरस्कार’ प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी डबल उपमहाराष्ट्र केसरी तथा करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल(भाऊ)पाटील यांना ‘मल्हाररत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर,ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस पुणे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे,कार्यक्रमाचे संयोजक धनंजय तानले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल ग्रामपंचायत जेऊरच्या वतीने सभापती अतुल(भाऊ)पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मा.आ.नारायण(आबा)पाटील स्वतःहा उपस्थितीत होते.त्यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल कुमार गाडिया,लोकनियुक्त सरपंच पृथ्वीराज पाटील,उपसरपंच नागेश झाजूर्णे ,प्रवक्ते सुनील तळेकर,मा.उपसरपंच धनंजय शिरस्कर,मा.सदस्य विनोद गरड,ग्रा.पं.सदस्य उमेश कांडेकर, मा.सरपंच भारत साळवे,मा.ग्रा.सदस्य हंबीरराव चव्हाण ,ग्रा.पं.सदस्य राकेश गरड,मा.सदस्य बापूसाहेब घाडगे,राजू गरड,धनंजय घोरपडे,मा.सदस्य मुबारक शेख,सोसायटी व्हाईस चेअरमन महेश कांडेकर,बहुजन संघर्ष सेनेचे गरड,ग्रा.पं.सदस्य शांताराम सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.