करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार जयवंतराव जगताप.. - Saptahik Sandesh

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार जयवंतराव जगताप..

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जगताप गटाचे नेते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज (ता.२४) दसरा विजयी दशमीनिमित्ताने करमाळा बाजार समिती येथे सभापतीपदाची निवडणूक पार पाडण्यात आली यामध्ये श्री जगताप यांची सभापतीपदी निवड झाली असून उपसभापतीपदी शैलजा मेहर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक : सहकारी संस्था : माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, विलास गुंडगीरे, सागर दोंड, जनार्धन नलवडे, तात्यासाहेब शिंदे, महादेव कामटे. महिला राखीव : साधना पवार, शौलजा मेहर. इतर मागासवर्ग : शिवजी राखुंडे. भटक्या जमाती : नागनाथ लकडे. ग्रामपंचायत : कशीनाथ काकडे, नवनाथ झोळ, बाळू पवार, कुलदीप पाटील. व्यापारी प्रतिनीधी : मनोज पितळे व परेशकुमार दोशी. हमाल तोलार : वालचंद रोडगे.

करमाळा बाजार समितीच्या स्थापने पासून काही अपवाद वगळता जगताप गटाचेच वर्चस्व होते. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सलग २९ वर्षे बाजार समितीचे सभापती पदी कामकाज पाहीले आहे. मागील निवडणूकीत सभापती वेळी झालेल्या बंडखोरीमुळे हाताशी आलेली सत्ता जगताप गटाने गमावली होती.  ५ वर्षांच्या ब्रेकनंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची पुन्हा एकदा सत्ता आली व श्री जगताप पुन्हा एकदा सभापती झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!