माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश -

माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश

0

करमाळा (दि. ११):  माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राजकीय धक्कातंत्र वापरत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. मुंबईतील “मुक्तागिरी” निवासस्थानी काल (दि. १०) हा प्रवेश सोहळा पार पडला.

या वेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेचे करमाळा-माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, तसेच सिंदखेडराजा (बुलढाणा) येथील माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर यांची उपस्थिती होती.

जयवंतराव जगताप हे 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले होते. काही कालांतराने त्यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली होती. आता परत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. जगताप यांच्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा फायदा होईल, असा राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे. लवकरच करमाळा येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित केला जाणार आहे.

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विकासाभिमुख नेतृत्व असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली धनुष्यबाण चिन्हावर करमाळा नगरपालिकेसह पंचायत समिती आणि इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवू,” असा निर्धार माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केला.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!